Samsung चा Galaxy M02 स्मार्टफोन भारतात लाँच | Samsung Galaxy M02 Smartphone Launch In India


दक्षिण कोरियाई स्मार्टफोन कंपनीने भारतात त्यांचा Samsung Galaxy M02 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ इन्फिनिटी V डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा स्मार्टफोन MediaTek च्या प्रोसेसर वर चालतो. या स्मार्टफोन च्या बॅटरी ची क्षमता 5000 mAh असून सोबत 10 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये रिअर ला 13 MP मुख्य आणि 2 MP मायक्रो कॅमेरा असून फ्रंट ला 5 MP कॅमेरा सेटअप आहे.

Samsung Galaxy M02 हा स्मार्टफोन Android 10 बेस्ड One UI वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS/A-GPS आणि USB Type-C कनेक्टिव्हिटी चे पर्याय उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनमध्ये 2GB RAM+32GB STORAGE आणि 3GB RAM+32GB STORAGE असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे हा स्मार्टफोन 1 TB पर्यंत मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन ९ फेब्रुवारी २०२१ पासून खरेदीसाठी उपलब्ध होणार असून या स्मार्टफोन ची प्रास्ताविक किंमत ₹: ६,९९९ आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या: https://amzn.clnk.in/dEfM

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या