ब्लॉग म्हणजे काय ? | What Is Blog In Marathi


आजच्या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण ब्लॉग म्हणजे काय, ब्लॉग चे किती प्रकार असतात याविषयी माहिती करून घेणार आहोत.

ब्लॉग म्हणजे काय ? (What Is Mean By Blog ?)

ब्लॉग ला मराठी मध्ये अनुदिनी असे म्हटले जाते. ब्लॉग हा शब्द वेब आणि लॉग या दोन इंग्रजी शब्दांना जोडून बनलेला आहे. ब्लॉग हे एक प्रकार चे संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचा भाग असू शकते. ब्लॉग चा उपयोग स्वतःचे विचार, अनुभव इंटरनेट च्या आधारे सगळ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी केला जातो. ब्लॉग वर लिहिल्या जाणाऱ्या मजकुराला ब्लॉग पोस्ट असे म्हणतात. 

ब्लॉग हा एक डिजिटल डायरी प्रमाणे असतो. ब्लॉग वरील पोस्ट या उलट्या क्रमाने मांडल्या जातात म्हणजे नवीन पोस्ट हि सर्वात वर दिसेल आणि जुनी पोस्ट हि त्या नवीन पोस्ट च्या खाली दिसणार. ब्लॉग पोस्ट हि टेक्स्ट, फोटो, ऑडिओ आणि विडिओ यापैकी कोणत्याही स्वरूपात असू शकते. 

ब्लॉग पोस्ट लिहीणार्या व्यक्ती ला ब्लॉगर असे म्हणतात तर ब्लॉग वर नियमित पोस्ट प्रसिद्ध करण्याला ब्लॉगिंग असे म्हणतात.

ब्लॉग चे प्रकार (Types Of Blog)

वैयक्तिक ब्लॉग (Personal Blog)

एखादी व्यक्ती जेंव्हा स्वतःच्या आवडीनुसार ब्लॉगवर मजकूर प्रसिद्ध करते. तेंव्हा त्याला वैयक्तिक ब्लॉग म्हणतात.

सहयोगी किंवा गट ब्लॉग (Group Blog)

ज्या ब्लॉग वर एकापेक्षा जास्त लेखकांद्वारे ब्लॉग पोस्ट प्रसिद्ध केली जाते त्या ब्लॉग ला सहयोगी किंवा गट ब्लॉग असे म्हणतात.

मायक्रो ब्लॉग (Micro Blog)

 ज्या ब्लॉग पोस्ट मोजक्या आणि संक्षिप्त स्वरूपात प्रसिद्ध केल्या जातात. त्यांना मायक्रो ब्लॉग असे म्हणतात.
उदा. ट्विटर 
 
संस्थात्मक ब्लॉग (Institutional Blog)

या ब्लॉग चा वापर खाजगी किंवा सरकारी संस्थात्मक कामासाठी केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या