विंडोज फोन वरील व्हॉट्सॲप सपोर्ट होणार बंद


जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मॅसेजिंग सुविधा पुरविणारे ॲप व्हॉट्सॲप ने जाहीर केले आहे कि वर्षाच्या अखेरिस विंडोज ओएस वर आधारित सर्व स्मार्टफोन वरील व्हॉट्सॲप सपोर्ट बंद होणार आहे.

व्हॉट्सॲप ने केलेल्या ब्लॉग पोस्ट नुसार ३१ डिसेंबर २०१९ पासून सर्व विंडोज स्मार्टफोन वरून व्हॉट्सॲप ची सेवा संपुष्टात येणार आहे. त्यामुळे विंडोज आधारित स्मार्टफोन वापरकर्त्यांना दुसरा पर्याय शोधणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे फेब्रुवारी २०२० पासून अँड्रॉईड आवृत्ती २.३.७ (त्यापेक्षा जुन्या आवृत्ती) आणि आयओएस ७ (त्यापेक्षा जुन्या आवृत्ती) वर देखील व्हॉट्सॲप सपोर्ट बंद होणार आहे.

Post a Comment

0 Comments