व्हॉट्सअ‍ॅप चे नवीन फिचर

WhatsApp Lounched New Features

आज व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप द्वारे आपण संदेश, चित्रे, ध्वनी, चित्रफीत आणि इतर फाईल्स देखील एकमेकांना पाठवू शकतो.

अलीकडेच व्हॉट्सअॅप ने आपले "सेंड मेसेज" हे नवीन फिचर आणले आहे. बर्‍याच वेळा व्हॉट्सअॅप ग्रुप मेंबर संबधित ग्रुप मध्ये अनावश्यक मेसेज पाठवत असतात. बर्‍याच वेळा असे अनावश्यक मेसेज त्रासदायक ठरतात. या सगळ्यांवर आतापर्यंत व्हॉट्सअॅप ग्रुप ॲडमिन चे कोणतेही नियंत्रण नव्हते. परंतु या नवीन फिचरमुळे ग्रुपमध्ये संदेश पाठविण्याचा अधिकार कोणाला द्यावा आणि कोणाला देऊ नये हे ग्रुप ॲडमिन ठरवू शकणार आहे. यामुळे ग्रुप मध्ये होणार्‍या संभाषणांवर ग्रुप ॲडमिन  नियंत्रण राहणार आहे.

व्हॉट्सअॅप चे हे नवीन फिचर अँड्रॉईड आणि आयओएस युजर्स साठी उपलब्ध आहे.

व्हॉट्सअ‍ॅप चे नवीन फिचर व्हॉट्सअ‍ॅप चे नवीन फिचर Reviewed by वेबकट्टा on ७/०४/२०१८ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: