Jio ने सादर केला Jio Phone 2

Jio Launches Jio Phone 2

आज रिलायन्स जिओ या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीने २१ कोटी  ५० लाख ग्राहकांचा टप्पा ओलांडलेला आहे. रिलायन्स समुहाच्या वार्षिक बैठकीत जिओ फोन २ ची घोषणा करण्यात आली. जिओ फोन २ ही  जिओ फोन ची सुधारित आवृत्ती आहे. जिओ फोन २ चे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपण WhatsApp, Facebook आणि Youtube या अॅप्स चा आनंद घेऊ शकता. या आधी च्या जिओ फोन मध्ये या सुविधा नव्हत्या.

Jio Launches Jio Phone 2

जिओ फोन २ ची नोंदणी ही १५ ऑगस्टपासून सुरू होणार असून त्याची किंमत २,९९९ रुपये असणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ५०१ रुपये देऊन तुमच्या जुन्या  जिओ फोन च्या बदल्यात नवा जिओ फोन २ खरेदी करू शकता.

आता बघूया जिओ फोन २ चे तांत्रिक तपशील

ओएस : केएआय ओएस
सिम: डुअल सिम
कीपॅड : क्‍यूआरटी कीपॅड
डिस्प्ले : २.४० इंच
रॅम : ५१२ एमबी
रिअर कॅमेरा : २ मेगापिक्‍सेल
फ्रंट कॅमेरा : ०.३ मेगापिक्‍सेल
बॅटरी : २००० एमएएच
स्टोरेज : इंटरनल ४ जीबी + एक्सटर्नल १२८ जीबी पर्यंत
कनेक्टिविटी : वीओएलटीई, वीओवाईफाई, वाईफाई, एनएफसी, जीपीएस, ब्लूटूथ
इतर : व्हॉट्‌सॲपसह फेसबुक, यूट्यूब सह
किंमत : २,९९९ रुपये

Jio ने सादर केला Jio Phone 2 Jio ने सादर केला Jio Phone 2 Reviewed by वेबकट्टा on ७/०६/२०१८ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: