महाजालाच्या दुनियेतील धोके (Cyber Threats)

Online Cyber Threats

सध्याच्या युगात जगाच्या पाठीवर लाखो व्यक्ती या दररोज इंटरनेट चा वापर करतात. आजच्या ऑनलाइन युगात इंटरनेट हे एक अत्यावश्यक आणि महत्वाचे माध्यम बनलेलं आहे. इंटरनेट चा वापर आपण संवाद, शिक्षण, मनोरंजन आणि आर्थिक व्यवहार इत्यादिसाठी करतो, परंतु इंटरनेट चा वापर जपून न केल्यास अनेक धोकेही संभवतात. एका निष्कर्षानुसार असे लक्षात आलेले आहे की जगातील जवळपास ५० टक्क्यांहून अधिक संगणक हे व्हायरस (Virus) आणि मालवेअर (Malware) मुळे संक्रमित आहेत.

मालवेअर (Malware)

मालवेअर म्हणजे मॅलिशस सॉफ्टवेअर (Malicious Software). मालवेअर हे युजरची कोणतीही परवानगी न घेता युजरच्या संगणकामध्ये इंस्टॉल होतात. व्हायरस, वर्म आणि ट्रोजन हॉर्स ही काही मॅलिशस सॉफ्टवेअर ची उदाहरणे आहेत ज्यांना मालवेअर असे म्हणतात.

ट्रोजन हॉर्स (Trojan Horse)

ट्रोजन हॉर्स हे एक प्रकारचे संगणकाला हानी पोहोचवणारे मॅलिशस सॉफ्टवेअर (Malicious Software). आहे. ट्रोजन हॉर्स हे संगणकात गुपचुप प्रवेश मिळवून इन्स्टॉल केले जावे यासाठी ते अतिशय साधारण स्वरुपाचे भासवतात आणि संगणकात ‘बॅकडोअर’ तयार करतात. ट्रोजन हॉर्स हे युजरच्या लक्षात न येऊ देता वैयक्तिक माहिती चोरू शकतात.

व्हायरस (Virus)

व्हायरस हे संगणकाला धोका पोहोचवणारे मॅलिशस प्रोग्रॅम (Malicious Program) आहेत. व्हायरस हे विविध माध्यमांचा वापर करून एका संगणकातून दुसर्‍या संगणकात प्रवेश करतात. व्हायरसमुळे तुमच्या संगणकातील माहिती करप्ट (Currupt) होण्याचा किंवा डिलीट होण्याचा धोका असतो किंवा हार्ड ड्राईव (Hard Drive) खराब होऊ शकतो.

वर्म (Worm)

वर्म हे स्वतं:ची प्रतिकृती (Replicate) तयार करणारे मॅलिशस प्रोग्रॅम (Malicious Program) आहेत. वर्म स्वतं:ची प्रतिकृती तयार करून दुसर्‍या संगणकावर पाठविण्यासाठी संगणक नेटवर्क चा वापर करतात. वर्ममुळे संगणक नेटवर्क ला धोका निर्माण होऊ शकतो.

स्पायवेअर (Spyware)

स्पायवेअर हे एक अश्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे की ज्याचा वापर एखाद्या युजरची वैयक्तिक माहिती आणि ऑनलाइन अॅक्टिविटी ची माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. स्पायवेअर हे संगणकातून शोधून काढणे खूप कठीण असते.

महाजालाच्या दुनियेतील धोके (Cyber Threats) महाजालाच्या दुनियेतील धोके (Cyber Threats) Reviewed by वेबकट्टा on १२/०७/२०१७ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: