मोबाईल वॉलेट (Mobile Wallet) म्हणजे काय ?

What Is Mobile Wallet ?

मोबाईल वॉलेट म्हणजे काय ?

साधारण शब्दांत सांगायचे झाल्यास मोबाईल वॉलेट (Mobile Wallet) हे मोबाईलमध्ये उघडल्या जाणार्‍या बँक खात्याप्रमाणे आहे. इंटरनेट चा वापर करून आपण ज्याप्रमाणे इतर खाते उघडतो, उदा. ई-मेल त्याचप्रमाणे मोबाईल वॉलेट सुद्धा एक आभासी (Virtual) खाते आहे.

मोबाईल वॉलेट हे तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर ला आधार बनवून तुमचे ऑनलाइन व्यवहार करण्यास मदत करते. मोबाईल वॉलेट चा फायदा असा की आज मोबाईल हे प्रत्येकाकडे उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक वापरकर्ता या मोबाईलवॉलेट चा उपयोग करू शकतो.

मोबाईल वॉलेट हे ठराविक रक्कम साठवून त्या रकमेचा वापर इतर व्यवहार करण्यास मदत करते. मोबाईल वॉलेट चा वापर हा सर्व प्रकारचे ऑनलाइन व्यवहार (Online Transaction) उदा. पैसे मिळवणे, पैसे पाठवणे, खरेदी करणे,  रीचार्ज करणे, बिल भरणा, तिकीट बुकिंग इत्यादि कामांसाठी होतो.

मोबाईल वॉलेट मध्ये तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यातून अगदी सुरक्षितपणे ठराविक रक्कम वळवू  शकता आणि त्या रकमेचा वापर मोबाईल वॉलेट द्वारे पुरविण्यात आलेल्या सेवांसाठी करू शकता.

मोबाईल वॉलेटचा वापर कसा करावा ?

कोणत्याही मोबाईल वॉलेट चा वापर करण्यासाठी आधी तुम्हाला त्या वॉलेट सेवेमध्ये खाते उघडणे आवश्यक असते. खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल, नाव इत्यादि माहिती द्यावी लागते. वॉलेट सुरू करण्यासाठी त्या वॉलेट चा अनुप्रयोग (Application) डाऊनलोड करून घ्यावा किंवा त्याचे संकेतस्थळ (Website) असल्यास तेथे जाऊन आवश्यक माहिती पुरवून साइन अप (Sign Up) करावे लागेल.

खाते उघडल्या नंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा  इंटरनेट बँकिंग यापैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमच्या बँक खात्यातील ठराविक रक्कम तुमच्या मोबाईल वॉलेट मध्ये जमा करू शकता. अश्याप्रकारे आपण त्या रकमेचा वापर मोबाईल वॉलेट द्वारे पुरविण्यात आलेल्या सेवांसाठी करू शकता. 

मोबाईल वॉलेट चे फायदे

१. मोबाईल वॉलेट मध्ये आपण आपल्या गरजेप्रमाणे ठराविक रक्कम साठवून ठेऊ शकतो.

२. व्यवहार करण्यासाठी  क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा  इंटरनेट बँकिंग  प्रमाणे परत-परत माहिती भरण्याची गरज पडत नाही.

३. मोबाईल वॉलेट मध्ये जवळपास सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला नगदी पैसे जवळ ठेवायची गरज पडत नाही.

४. बहुतेक वेळा नगदी खरेदी करताना सुट्या पैशांचा तुटवडा निर्माण होतो परंतु वॉलेट मुळे होत नाही.

५. वॉलेट द्वारे होणारे व्यवहार हे अत्यंत सुरक्षित (Secure Transaction) असतात कारण प्रत्येक व्यवहार करतांना नवीन कोड (OTP) निर्माण होतो आणि त्याचा वापर हा मर्यादित वेळेतच होवू शकतो.

सध्या उपलब्ध असलेले काही लोकप्रिय मोबाईल वॉलेट

१. पेटीएम (Paytm)

२. फ्रीचार्ज (Freecharge)

३. मोबीक्विक (Mobikwik)

४. ऑक्सिजन (Oxygen)

५. पेयूमनी (Payumoney)

मोबाईल वॉलेट (Mobile Wallet) म्हणजे काय ?  मोबाईल वॉलेट (Mobile Wallet) म्हणजे काय ? Reviewed by वेबकट्टा on ९/१६/२०१७ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: