ब्लॉग म्हणजे काय ?

What Is Blog ?

आजच युग हे तंत्राज्ञानाचं युग आहे, परंतु आजही ब्लॉग (Blog) किंवा ब्लॉगिंग (Blogging) म्हणजे काय आहे हे बहुतेक जणांना माहिती नाही. म्हणून, मला असं वाटतं कि या ब्लॉगच्या माध्यमातून आधी याविषयी माहिती देन गरजेच आहे. ज्यांनी ब्लॉगिंग (Blogging) विषयी मित्रांकडून, मिडिया किंवा आणखी कोणत्या सोर्स मधून थोडं फार जरी ऐकलेलं असेल त्याचं शंका निरसन या पोस्ट मधून होऊ शकत.

आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया,

ब्लॉग (Blog) ला मराठी मध्ये अनुदिनी असे म्हणतात. ब्लॉग (Blog) हा शब्द दोन इंग्रजी शब्दांपासून तयार झालेला आहे. पहिला शब्द म्हणजे  वेब(आंतरजाल) (Web) आणि दूसरा शब्द आहे लॉग(नोंद) (Log). ब्लॉग (Blog) हे एका प्रकारचे संकेतस्थळ (Web Site) किंवा संकेतस्थळाचा भाग (Subdomain) असते. एखाद्या मासिका प्रमाणे ब्लॉग (Blog) वरील नोंदी बहुतेक वेळा उलट्या कालक्रमानुसार टाकलेल्या असतात. म्हणजे सर्वात ताजी पोस्ट सर्वात आधी दिसेल. ब्लॉग (Blog) स्वतःचे विचार, एखाद्या कार्यक्रमाची माहिती, रेखाचित्र व चित्रफिती वगैरे गोष्टी इंटरनेटच्या (Internet) आधारे सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बनवतात.

ब्लॉग शी संबधित विविध व्याख्या

  • ब्लॉगर (Blogger) : ब्लॉग पोस्ट लिहिणार्‍या व्यक्तिला ब्लॉगर म्हणतात. 

ब्लॉग (Blog) चा उपयोग हा विविध प्रकारे केला जाऊ शकतो. ब्लॉग (Blog) हे संवाद आणि ज्ञान प्रसार करण्यासाठी एक चांगले माध्यम आहे. ब्लॉग च्या माध्यमातून आपण एकमेकांशी चर्चा करू शकतो किंवा कोणत्याही ब्लॉग चे सभासद होऊन तिथे स्वतःचे विचार मांडू शकतो. बरेच ब्लॉग हे बातम्या च्या प्रसारासाठी किंवा समाजोपयोगा साठी बनविण्यात आलेले आहेत. ब्लॉग्ज हे जरी सामान्यतः लिखाणासाठी बनवलेले असले, तरीही बऱ्याच ब्लॉग्जचा केंद्रबिंदू हा कला, चित्र, चित्रफिती, संगीत आणि आवाज असतो. ब्लॉग चा वापर हा वैयक्तिक डायरीप्रमाणे करता येतो. दोन ब्लॉग मधील संपर्क विजेट्स द्वारे शक्य होतो . 

ब्लॉग (Blog) वर लिखाण केलेले असल्यास वाचकांना आपले विचार आणि टिप्पणी देण्यासाठी केलेली सोय ब्लॉग्जना विशेष महत्त्व मिळवून देते. ब्लॉग मध्ये मुख्यत्वे लिंक्स तसेच कमेंट यांचा समावेश होतो. ब्लॉग तयार करण्यासाठी लागणार्‍या साधंनांना ब्लॉग टूल्स (Blog Tools) असे म्हणतात. आज ब्लॉग बनविण्यासाठी विविध ब्लॉग टूल्स उपलब्ध आहेत. 

उदा: ब्लॉगस्पॉट (Blogspot), वर्डप्रेस (Wordpress) इत्यादि.

ब्लॉग चा इतिहास

वेबलॉग (WebLog) ह्या शब्दाचे जनक जॉर्न बारजर हे आहेत. हा शब्द त्यांनी १७ डिसेंबर १९९७ला बनवला. ह्या शब्दाचे संक्षिप्त रूप म्हणजेच ब्लॉग ह्या शब्दासाठी मात्र पीटर मेर्होल्झ हे जवाबदार होते. मेर्होल्झ ह्यांनी हा शब्द पीटरमी.कॉम च्या साइडबारवर प्रदर्शित केला. त्यानंतर थोडक्या काळात ईव्हान विल्यम ह्यांनी पायरा लॅब्ज येथे ब्लॉग हा शब्द नाम व क्रियापद दोन्ही प्रकारे वापरला ( टु ब्लॉग म्हणजे एका वेबलॉगमध्ये बदल करणे अथवा एक ब्लॉग पोस्ट करणे) आणि ब्लॉगर हा शब्दही पायरा लॅब्जने एक ब्लॉगर प्रॉडक्ट म्हणून तयार केला. हे शब्द आता चांगलेच रूढ झाले आहेत.

ब्लॉग चे प्रकार

  • वैयक्तिक अनुदिनी/ब्लॉग : वैयक्तिक कारणांसाठी ही अनुदिनी लिहिली जाते. विशेषेकरून हे ब्लॉग स्वतःच्या नावाने प्रकाशित होतात.
  • व्यावहारिक अनुदिनी/ब्लॉग : प्रकल्पाची वा संस्थेची माहिती देण्यासाठी अशा अनुदिनींचा उपयोग करतात.

संदर्भ : विकिपीडिया
ब्लॉग म्हणजे काय ?  ब्लॉग म्हणजे काय ? Reviewed by वेबकट्टा on ९/१४/२०१७ Rating: 5

1 टिप्पणी: