ब्लॉगिंग शी निगडीत संकल्पना

Terms Related To Blogging

मागील पोस्ट मध्ये आपण ब्लॉग म्हणजे काय याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे , या लेखात आपण ब्लॉगिंग शी निगडीत मूलभूत संकल्पना समजून घेणार आहोत. या संकल्पना ब्लॉगिंग करताना आपल्याला वारंवार ऐकायला मिळतिल तसेच या संकल्पना ब्लॉगिंग विश्वात अत्यंत महत्वाच्या आहेत.

चला तर मग बघूया काय आहेत या संकल्पना...

एसइओ - सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन  (Search Engine Optimization)

एसइओ (SEO) किंवा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ही एक अशी प्रोसेस आहे कि ज्याद्वारे आपले वेब पेज अथवा वेब साईट सर्च इंजिन मध्ये शोधण्यासाठी अनुकूल केल्या जाते. एसइओ चा वापर वेब साइट चा रँक वाढविण्यासाठी केला जातो. जसा जसा वेब साईट चा रॅंक वाढत जातो त्याप्रमाणे वेब साईट ही सर्च इंजिन रिझल्ट मध्ये दिसू लागते. सर्च इंजिन च्या रिझल्ट मध्ये विडिओ,  इमेजेस किंवा किवर्ड्स यांचा समावेश असू शकतो. 

वेब साईट किंवा ब्लॉग चे मोनेटाईझेशन (Monetization of Website or Blog)

मोनेटाईझेशन म्हणजे ब्लॉग किंवा वेब साईट ला मिळणार्‍या ट्राफिक चे रूपांतर उत्पन्नामध्ये करणे होय. आपल्या ब्लॉग किंवा वेब साईट वर विविध प्रकारच्या जाहिराती ठेऊन आपण पैसे मिळवू शकतो. जाहिरातींचा पुरवठा करणारे विविध नेटवर्क्स आज इंटरनेट वर उपलब्ध आहेत. या वेबसाईट्स दोन प्रकारे सुविधा पुरवितात त्या खालील प्रमाणे 
  • पे-पर-क्लिक (Pay-Par-Click)
  • पी-पी-एम (Pay-Per-Impression)

अॅफिलेट प्रोग्रॅम्स (Affiliate Programs)

अॅफिलेट प्रोग्रॅम्स ही संकल्पना थोडीशी मोनेटाईझेशन या संकल्पनेशी निगडीत वाटते परंतु दोन्ही मध्ये थोडा फरक आहे . अॅफिलेट प्रोग्रॅम्स मध्ये कमिशन च्या देवाण-घेवाण चा समावेश होतो. ई-मेल मार्केटिंग, रेफरल मार्केटिंग आणि कंटेंट मार्केटिंग यांचा अॅफिलेट प्रोग्रॅम्स मध्ये वापर होतो.

बॅकलिंक्स (Backlinks)

साधारणपणे बॅकलिंक्स म्हणजे दुसर्‍या वेब साईट वरून किंवा ब्लॉग वरून आपल्या ब्लॉग किंवा वेब साईट ला मिळणारा दुवा किंवा लिंक होय. बॅकलिंक्स ना इन कमिंग लिंक्स म्हणून सुद्धा ओळखले जाते. वेबसाइट नेविगेशन साठी बॅकलिंक्स अत्यंत महत्वाच्या असतात. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन च्या दृष्टीने बॅकलिंक्स खूप आवश्यक असते तसेच या तुमचा ब्लॉग किंवा वेब साईट लोकप्रिय होण्यास मदत करतात.

साईटमॅप (Sitemap)

साईटमॅप हे एखाद्या वृक्षाच्या रचंनेप्रमाणे असते. साईटमॅप मध्ये वेब साईट मधील सर्व पृष्ठांची सूची समाविष्ट केलेली  असते. वेब  साईट ला  भेट  देणार्‍याला  साईटमॅप अत्यंत उपयोगी  पडतो.  सहसा  साईटमॅप हे  दोन प्रकारचे  असतात 
  • XML साईटमॅप
  • HTML साईटमॅप 
पुढे येणार्‍या पोस्ट्स  / लेखांमध्ये आपण  या संकल्पनांविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. हा लेख तुम्हाला आवडला  असेल  तर शेअर आणि कमेंट  करायला  विसरू  नका.
ब्लॉगिंग शी निगडीत संकल्पना ब्लॉगिंग शी निगडीत संकल्पना Reviewed by वेबकट्टा on ९/१४/२०१७ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: