सुरक्षित पासवर्ड कसा तयार करावा ?

How To Create Strong Password Tips

आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सुरक्षित पासवर्ड तयार करण्यासाठी काही टिप्स:


आपल्या प्रत्येक खात्यासाठी विशिष्ट पासवर्ड वापरा

आपली प्रत्येक महत्वाच्या खात्यांसाठी (उदा. ईमेल, ऑनलाईन बँकिंग) नेहमी वेगवेगळी पासवर्ड वापरली पाहिजे. कारण एकाच पासवर्ड चा परत वापर करणे हे धोकादायक ठरू शकते. जर कोणी आपला पासवर्ड मिळविला तर त्याचा उपयोग वैयक्तिक माहिती मिळविण्यासाठी किंवा ऑनलाईन बँकिंग चा वापर करून तुमचे आर्थिक नुकसान करू शकतो.

अंक, अक्षरे आणि चिन्हे यांचा एकत्रितपणे वापर करा

आपल्या पासवर्ड मध्ये अंक, अक्षर आणि चिन्हांचा वापर केल्यास इतर व्यक्तींसाठी त्या पासवर्ड चा अंदाज लावणे कठीण जाते. कारण जर आपण लोवर केस मधील फक्त आठ अक्षरांचा जरी विचार केला तरी तीस हजार संभावित पासवर्ड बनू शकता.

पासवर्ड मध्ये वैयक्तिक माहिती किंवा सामान्य शब्दांचा वापर टाळावा

नेहमी पासवर्ड बनवतांना याची खात्री करून घ्यावी की आपला पासवर्ड आपल्या वैयक्तिक माहितीशी निगडीत नसावा. त्याचप्रमाणे कोणत्याही सामान्य शब्दांचा वापर टाळावा. तुमचा फोन नंबर, मोबाईल नंबर, तुमच्या बँक अकाऊंटचा नंबर, तुमची अथवा कुटुंबातील कुणाचीही जन्मतारीख, मुलामुलींची नावे, तुमचे टोपण नाव इत्यादींचा वापर चुकूनही करु नका, जेणेकरुन इतरांना तुमच्या पासवर्डचा अंदाज येऊ शकेल.

पासवर्ड बॅकअप

भविष्यात जर आपला पासवर्ड रिसेट करण्याची गरज असल्यास पासवर्ड बॅकअप साठी आपला मोबाइल नंबर आणि सेकंडरी ई-मेल नियमित अद्ययावत असायला हवा. कारण रिसेट कोड प्राप्त करण्यासाठी आपला मोबाइल नंबर आणि सेकंडरी ई-मेल आपल्या खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे.

आपण जर पासवर्ड विसरलात तर काही वेबसाइट सुरक्षा प्रश्न विचारून सुद्धा पासवर्ड रिसेट करण्यास मदत करतात. येथे तुम्ही स्वतःचा प्रश्न स्वत: सुद्धा बनवू शकता परंतु उत्तरामध्ये वैयक्तिक माहिती किंवा सामान्य शब्दांचा वापर टाळावा. नेहमी असाच प्रश्न निवडावा की ज्याचे उत्तर फक्त तुम्हालाचं माहिती असेल.

आपला पासवर्ड सुरक्षित ठेवा

आपला संगणक किंवा टेबल इत्यादि वर कधीही तुमचा पासवर्ड लिहून ठेऊ नये. कारण इतर संगणक वापरकर्त्याला तो सहजपणे मिळू शकतो. जर तुम्ही पासवर्ड एखाद्या फाइल मध्ये जतन करून ठेवत असाल तर याची काळजी घ्यावी की त्या फाइल मध्ये काय आहे याची माहिती कोणालाही कळू नये.

जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पासवर्ड लक्षात ठेवणे कठीण जात असेल तर तुम्ही पासवर्ड मॅनेजर चा सुद्धा वापर करू शकता परंतु पासवर्ड मॅनेजर ची विश्वसनीयता काय आहे याची खात्री जरूर करून घ्यावी.
सुरक्षित पासवर्ड कसा तयार करावा ? सुरक्षित पासवर्ड कसा तयार करावा ? Reviewed by वेबकट्टा on ९/१४/२०१७ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: