ब्लॉग सुरू करण्यापूर्वी...

Before Starting A Blog

तुम्हाला ब्लॉग सुरू करायचा आहे ?  परंतु ब्लॉग सुरू करण्याआधी खालील मुद्द्या वर चर्चा करणे अत्यंत आवश्यक आहे.

ब्लॉग का सुरू करायचं आहे?

तुम्हाला जो पर्यंत वरील प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तो पर्यंत तुम्ही ब्लॉगिंग बद्दल एकाग्र राहू शकत नाही. जेंव्हा तुम्ही ठरवलं की मला अमुक-अमुक विषयासाठी ब्लॉग तयार करायचा आहे तेव्हा तुम्हाला ब्लॉग पोस्ट्स लिहायला अत्यंत सोपे जाईल . मागील पोस्ट मध्ये उल्लेख केल्या प्रमाणे ब्लॉग हे दोन प्रकारचे असू शकतात. पहिला म्हणजे वैयक्तीक ब्लॉग आणि दूसरा प्रकार म्हणजे व्यवसायिक ब्लॉग यापैकी तुम्ही कोणत्या प्रकारची ब्लॉगिंग करणार आहात ते ठरवून घ्यावे.

जर तुम्हाला स्वतःचे विचार जगापर्यंत पोहोचवायचे असल्यास वैयक्तीक ब्लॉग निवडावा किंवा तुमचा उद्देश्य पैसे कमावणे असेल तर तुम्ही विविध जाहिराती ब्लॉग वर ठेऊन उत्पन्न मिळवू शकता.

ब्लॉग चा विषय

ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्ही कोणत्या विषयाला धरून पोस्ट लिहिनार हे ठरवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला कोणत्या विषयाचे परीपूर्ण ज्ञान आहे आणि तो विषय तुमच्या ब्लॉगच्या वाचकांना आवडेल का हा विचार करून ठरवावा. ठरवलेल्या विषयाचे छोटे छोटे उप-विषय करावे आणि त्याची यादी करावी. अश्या प्रकारे तुम्ही प्रत्येक उप-विषय घेऊन त्यावर दीर्घ लिखाण करू शकता. मागील पोस्ट मध्ये उल्लेख केल्या प्रमाणे ब्लॉग्स चा केंद्रबिंदू हा कला , चित्र, संगीत, चित्रफिती, आवाज किंवा तंत्र ज्ञान असू शकतो.

ब्लॉग ची भाषा 

ब्लॉग ची भाषा ही तुमचं ब्लॉगच लिखाण कोणत्या मुद्द्यांवर आहे यावरून स्पष्ट होईल. जसे की प्रादेशिक ब्लॉग साठी मराठी भाषा आणि नंतर हिन्दी किंवा इंग्रजी भाषा. अश्याप्रकारे ब्लॉगचा विषय ठरविल्यावर आपला ब्लॉग हा कोणत्या भाषेतून असणार आहे याचा देखील विचार करावा.

ब्लॉग चे नाव

ब्लॉगचा विषय ठरविल्यावर आपल्या ब्लॉग चे नाव हे ब्लॉग च्या विषयाशी अनुरूप असावे. त्यामुळे तुमच्या ब्लॉगच्या वाचकांना तुमचा ब्लॉग शोधण्यास मदत होईल. 

ब्लॉग चे वाचक

कोणत्याही ब्लॉग ला वाचकवर्ग असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वाचकांचा अंदाज घेवून लिखाण करणे देखील आवश्य़क आहे. जसे की जर तुमचा ब्लॉग हा कथा किंवा कवितांशी संबंधित असेल तर त्या वर्गाला समोर ठेऊन लिखाण करणे उत्तम राहील किंवा जर तंत्रज्ञान विषयक ब्लॉग असेल तर त्या वर्गातील वाचकांना समजेल अश्या भाषेत पोस्ट लिहाव्या. म्हणून कोणतीही पोस्ट लिहितांना वाचक डोळ्यासमोर ठेऊनच पोस्ट लिहावी. 

ब्लॉगचा पत्ता (URL) 

ब्लॉग चा पत्ता किंवा यूआरएल ही तुमच्या नावाने किंवा कोणत्याही नावाने ठरवू शकता. जर तुमच्या ब्लॉग च्या विषयाशी अनुरूप असेल तर उत्तम. ब्लॉगची यूआरएल ही शक्यतो यूनिक असावी तसेच वाचकांना लक्षात राहील अश्या प्रकारे असावी.
ब्लॉग सुरू करण्यापूर्वी... ब्लॉग सुरू करण्यापूर्वी... Reviewed by वेबकट्टा on ९/१६/२०१७ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: